सातारा : समाज कल्याण विभागांतर्गत पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील एकूण १७ शासकीय निवासी शाळांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता ६ वी ते १० वीपर्यंतच्या वर्गांसाठी हे प्रवेश उपलब्ध असून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी केले आहे.
या निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना निवास, पौष्टिक भोजन, शालेय गणवेश, लेखन साहित्य तसेच आधुनिक शैक्षणिक सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. प्रत्येक शाळेची प्रवेश क्षमता २०० इतकी असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो.
प्रवेशासाठी उपलब्ध शाळा व संपर्क
तरंगवाडी, ता. इंदापूर – राहुल कुकडे (9665869629)
दिवे, ता. पुरंदर – विमल खाडे (9503369524)
पेठ, ता. आंबेगाव – जितेंद्र खोसे (9420726814)
चांडोली, ता. खेड (मुलींची) – मनोज जाधव (7218013511)
म्हसवड, ता. माण – मनिषा साळुंखे (9423528643)
कवठेएकंद, ता. तासगाव – प्रविण भातलवंडे (9284801040)
कवठेमहांकाळ – धनाजी सरगर (9325385771)
वांगी, ता. कडेगाव – संतोष भोसले (8698029878)
विटा, ता. खानापूर – प्रितम भोसले (7028010118)
जल, ता. जत (मुलींची) – डिगंबर जाधव (8275207276)
बांबवडे, ता. पलूस (मुलींची) – करचे तानाजी दिलीप (9766040998)
अक्कलकोट – सुनीलकुमार विठ्ठल सुळ (8668821205)
नजीक पिंपरी, ता. मोहोळ – आण्णासाहेब नागनाथ शिंदे (9011350908)
गगनबावडा – जॉयसी परेरा (9403357043)
मसूदमाळे, ता. पन्हाळा – मनोहर वाघमारे (9762969955)
राधानगरी – सदानंद बगाडे (9423285864)
शिरोळ आगार, ता. शिरोळ – प्रदीप जवाहिरे (7517753555) या प्रमाणे आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” या प्रेरणादायी विचारातून ही योजना राबविली जात असून, पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांशी अथवा जवळच्या समाज कल्याण कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन वंदना कोचुरे यांनी केले आहे.