सातारा : राधिका रोडवर टपरीमध्ये दारु गुत्त्ता चालवल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मण कैलास साळुंखे (वय 24, रा. रविवारे पेठ, सातारा) व सुनील विश्वनाथ खंडजोडे (वय 36, रा. रविवार पेठ, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघे राधिका रस्त्यावर दारुचा गुत्ता चालवित असल्याचे आढळून आले आहे.