सातारा : भारत निवडक आयोगाने नुकत्याच निवडणूक जाहीर केलेल्या सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी सांगली यांनी सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व 16 नगरपरिषदा व नगरपंचायती आणि जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आज रोजी प्रसिद्ध केली आहे.
सर्व मतदारांना आणि नागरिकांना सदरहू प्रारूप मतदार यादी वरील कार्यालयांच्या नोटीस बोर्डवर पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.वरील मतदार यादीवर कोणाला काही आक्षेप, दुरुस्त्या अथवा नावे दाखल करण्याबाबत हरकती व सूचना सादर करावयाच्या असतील तर त्या दिनांक 27 मे 2026 पूर्वी उपरोक्त मतदान नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय सांगली अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे सादर करण्यात याव्यात असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.