सातारा : येथील सौ. रुपाली संदीप राक्षे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत 15 जून 2025 रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेत उज्वल यश मिळविले. त्यांना सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्रता मिळाली आहे. त्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कन्याशाळा, सातारा येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र अभ्यासक्रमातून त्यांनाही त्यांनी ही परीक्षा दिली होती.
या यशाबद्दल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे संचालक व कन्याशाळा सातारा, शाला समिती अध्यक्ष , श्री. दत्ताजी थोरात, सर्व शाला समिती सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा दौंडे, उपमुख्याध्यापक, श्री. संताजी चव्हाण, पर्यवेक्षक , श्री. प्रवीण काळे, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.