सैदापूर येथे दागिन्यांची चोरी; सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद

by Team Satara Today | published on : 16 July 2026


सातारा : सैदापूर, ता. सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 जून ते 13 जुलै दरम्यान सैदापूर, ता. सातारा येथील एका महिलेच्या राहत्या घरातून कपाटात असलेल्या लॉकर मधील 4.170 ग्रॅम वजनाचे कानातील दोन सोन्याचे वेल अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आंबेदरे येथे घरफोडी; सुमारे 31 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांकडून लंपास
पुढील बातमी
लिंब येथून राहत्या घरातून एक जण बेपत्ता झाल्याची फिर्याद

संबंधित बातम्या