सातारा : भारतीय जनता पार्टीच्या बिनविरोध नगरसेवकांची संख्या आता दोन झाली आहे. आशा पंडित या बिनविरोध झाल्यानंतर भाजपने दुसरे खाते उघडले आहे.
प्रभाग क्रमांक 13 मधून बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक बाळासाहेब खंदारे यांची बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक 13 मधून अपक्ष उमेदवार म्हणून दत्तू धबधबे यांनी अर्ज दाखल केला होता नेत्यांच्या विनंतीला मान देऊन धबधबे यांनी आपला अर्ज माघारी घेतला त्यामुळे खंदारे यांचा नगरसेवक पदाचा मार्ग मोकळा झाला आहे .खंदारे समर्थकांनी साताऱ्यात या बिनविरोध निवडीचा एकमेकांना साखर व पेढे भरून आनंद व्यक्त केला आहे.