महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन महामार्ग

7 तासांचा प्रवास 2 तासांत होणार

by Team Satara Today | published on : 31 March 2025


मुंबई : महाराष्ट्राला आणखी एक महामार्ग मिळणार आहे. त्यामुळे 7 तासांचा प्रवास फक्त 2 तासांत करता येणार आहे. हा महामार्ग पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणार आहे, अशी घोषणा केंद्रीय महामार्ग रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यान 15 हजार कोटी रुपये खर्चून एक नवीन महामार्ग तयार होणार असल्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर यादरम्यान नवा महामार्ग विकसित होईल आणि यामुळे सात तासांचा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होईल, अशी माहिती दिली आहे. गडकरी यांनी देशातील महामार्गावर होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असल्याचे सभागृहात सांगितले.

आगामी दोन वर्षात 2 पदरी रस्ते चार पदरी तर चार पदरी रस्ते सहा पदरी करण्यात येणार आहेत. देशातील जवळपास 25 हजार किलोमीटरचे दुपदरी रस्ते चौपदरी करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले आहे. राज्याला आणखी एक नवा महामार्गामुळं पुण्यासहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा एक नवा महामार्ग विकसित होणार असून या नव्या महामार्ग, प्रकल्पामुळे सात तासांचा प्रवास अवघ्या दोन तासात पूर्ण होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
पुढील बातमी
मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस जल्लोषासह उत्साहात साजरा

संबंधित बातम्या