वर्ये येथील अपघातात मालवाहतूक गाडीखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू; हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबीयांसह गावावर शोककळा

by Team Satara Today | published on : 05 October 2026


सातारा : वर्ये (ता. सातारा) येथील इयत्ता तिसरीमधील चिमुकल्याचा चारचाकी गाडीखाली येऊन झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक झालेल्या बालकाच्या एक्झिटमुळे कुटुंबीयांना धक्का बसला असून या हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबीयांसह गावावर शोककळा पसरली आहे.
वर्ये (ता. सातारा) येथील चिमुकला समर्थ विजय निकम (वय ९ वर्षे) याचा एका मालवाहतूक गाडीखाली सापडून अपघाती मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री ७.३० च्या सुमारास घडली. समर्थ हा अपत्‍यांमध्‍ये एकुलता एक मुलगा होता. तो हत्तीखाना येथील शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत होता. त्याचे कुटुंबीय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्याच्‍या एका मोठ्या बहीणचा तीन ते चार वर्षांपूर्वी नदीत बुडून मृत्यू झाला होता.
चिमुकल्या समर्थचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. पुढील अधिक तपास तालुका पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्याच्या पश्‍चात आई-वडील, तीन बहिणी, आजी, आजोबा व चुलते असा परिवार आहे.

कुटुंबावर दुःखाचा दुसरा आघात
निकम कुटुंब हे अत्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ३ ते ४ वर्षांपूर्वीच समर्थच्या मोठ्या बहिणीचा देखील नदीत बुडून मृत्यू झाला होता. आता एकुलत्या एक मुलाचाही अपघातात मृत्यू झाल्यामुळे या कुटुंबावर निसर्गाने अत्यंत क्रूर आघात केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वनविभागाच्या रिल स्टार अधिकाऱ्याला घरी घालवा; दलित महासंघाचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी मागणी
पुढील बातमी
स्‍त्री शक्तीच्या सहभागातून जिल्हाभर ५०० वनराई बंधारे; महिला, शेतकरी, ग्रामस्थांनी उपक्रमात सहभागी व्हावे - याशनी नागराजन

संबंधित बातम्या