सातारा : दारू पिण्यासाठी उधारीने पैसे दिले नाहीत, याचा राग मनात धरून एकाला त्याच्या मित्राने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अजित भानुदास कदम (वय 26, रा. महादरे, ता. सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, प्रथमेश प्रकाश कुलकर्णी (रा. नेने चौक, मंगळवार तळे, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 15 रोजी दुपारी दीडच्या सुमारास मंगळवार तळ्याशेजारील आंब्याच्या झाडाखाली घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजित कदम आणि प्रथमेश कुलकर्णी हे दोघे मित्र आहेत. मंगळवार तळयाजवळ ते दोघे उभे होते. त्यावेळी प्रथमेश कुलकर्णी याने त्याला दारू पिण्यासाठी उधारीने पैसे मागितले. मात्र, हे पैसे देण्यास नकार देताच प्रथमेश याने त्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. तो जमिनीवर खाली पडला असता त्याच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. त्यामुळे अजित रक्तबंबाळ झाला. हातावर, पायावर लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी अजितवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, डोक्यात टाके घालण्यात आले आहेत. हवालदार वाघ अधिक तपास करीत आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |

'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |