समर्थ मंदिर येथे महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यास धमकी : एकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा

by Team Satara Today | published on : 18 February 2026


सातारा : समर्थ मंदिर येथे रवी पार्क अपार्टमेंट येथील राहणारे शत्रुघ्न रामचंद्र पवार यांनी महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना दिनांक १७ रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

याबाबतची फिर्याद प्रियंका दिलीप खाडे (वय २८ वर्ष व्यवसाय सरकारी नोकरी टेक्निशियन महावितरण कंपनी शाखा राजवाडा राहणार मंगळवार पेठ सातारा) यांनी शाहूपुरी पोलिसात दिले आहे. प्रियांका खाडे या सरकारी गणवेशात त्यांचे सरकारी काम करण्यासाठी समर्थ मंदिर येथे गेल्या असताना शत्रुघ्न पवार यांनी त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, तसेच लाईट कट करून दाखव,  तुला दाखवतोच अशी धमकी देखील दिली असल्याची फिर्याद शाहूपुरी पोलिसात दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार शत्रुघ्न पवार यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार मदने करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिहे गावच्या हद्दीत पेट्रोल संपल्याने रस्त्याच्या बाजूला गाडीसह अज्ञात चोरट्याचा पोबारा
पुढील बातमी
शाहूनगर येथून महिला बेपत्ता झाल्याची सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

संबंधित बातम्या