दुचाकी आणि पिकअप जीपची समोरासमोर धडक; दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 17 June 2026


ढेबेवाडी : दुचाकी आणि पिकअप जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला. बनपुरी (ता. पाटण) नजीक आज सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात झाला. सूरज दीपक कुंभार (वय १६, रा. सळवे, ता. पाटण) असे अपघातातील मृत युवकाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी, आज सायंकाळी चारच्या सुमारास ढेबेवाडीकडून सळव्याकडे जाणारी दुचाकी (एमएच ४३ एपी ८४३९) व समोरून ढेबेवाडीकडे येणारी पिकअप (एमएच ५० एन १७५५) यांची बनपुरीनजीक समोरासमोर धडक झाली. 

या धडकेत दुचाकीस्वार सूरज कुंभारचा मृत्यू झाला. धडकेनंतर पिकअप रस्त्याच्या शेजारी उलटली. घटनेची माहिती कळताच ढेबेवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची माहिती घेतली. 

अपघातातील मृत सूरज कुंभारने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन अकरावीत प्रवेश घेतला होता. सळवे येथील घराकडे परतत असताना त्याच्या दुचाकीला अपघात झाला. त्याच्या मागे आई, वडील, बहीण, आजी असा परिवार आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खरीप हंगामावर दुष्काळाचे सावट; विहिरींनी तळ गाठल्याने पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या
पुढील बातमी
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची निवडणूक

संबंधित बातम्या