सातारा : सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाणारी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे. स्पर्धेचे हे १३ वे वर्ष असून स्पर्धेचा प्रारंभ रविवारी सकाळी ६.३० वाजता पोलिस परेड ग्राऊंड येथून होणार असून, सर्व स्पर्धकांनी पहाटे ५.३० वाजेपर्यंत पोलिस परेड ग्राउंडवर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
या स्पर्धेचा शुभारंभ राज्य उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, आमदार श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले व स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असलेले जय बालाजी ग्रुपचे संचालक श्री गौरव जजोदिया यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितीन तारळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ युवराज करपे, सातारा वन विभागाच्या उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता रोकडे, सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असणार आहे अशी माहिती संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ आदिती चंद्रशेखर घोरपडे, उपाध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित व सेक्रेटरी विशाल ढाणे यांनी संयुक्तरीत्या दिली.
या स्पर्धेची सुरुवात पोलिस परेड ग्राउंड येथून झाल्यानंतर पारंगे चौक, पोवई नाका, रयत शिक्षण संस्था, नगरपरिषद, अदालत वाडा, समर्थ मंदिर चौक, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून हॉटेल निवांत, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या २०० मीटर पुढे जाऊन परत त्याच मार्गाने पोलिस परेड ग्राउंड येथे स्पर्धेची सांगता होईल अशी माहिती रेस डायरेक्टर अभिषेक भंडारी यांनी दिली.
२१.१ कि.मी. अंतराच्या या स्पर्धा मार्गावर आठ ठिकाणी मदत केंद्रे उभारण्यात आली असून १ ले मदत केंद्र सैनिक सहकारी बँक, पोवई नाका येथे असून ही जबाबदारी डॉ पल्लवी पिसाळ आणि वैशाली वाडेकर सांभाळणार आहेत. २ रे मदत केंद्र डॉ पौर्णिमा फडतरे, भाग्यश्री ढाणे व त्यांच्या ढाणे मेघा इंजिनीअरिंग क्लासची टीम ही जबाबदारी सांभाळणार आहे. ३ रे मदत केंद्र अदालत वाडा येथे असून डॉ कैलास खडतरे, डॉ दीपक थोरात व त्यांच्या हॉस्पिटलची टीम त्यांच्या मदतीला असणार आहे. ४ थे मदत केंद्र यवतेश्वर घाटातील पॉवर हाऊस येथे असून नितीन किरवे आणि डॉ राजेश शिंदे हे सांभाळणार आहेत, त्या ठिकाणी पोदार इंटरनॅशनल स्कूलचा वाद्यवृंद असणार आहे. तर रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पची टीम या स्पर्धकांना मदत करणार आहे. ५ वे मदत केंद्र घाटातील दगडी खाणीजवळ असून डॉ दीपक बनकर, सचिन मांढरे सांभाळत असून, महाराजा ग्रुपची टीम त्यांच्या मदतीला असेल. ६ वे मदत केंद्र साईबाबा मंदिर येथील हॉटेल सेव्हन हिल्स येथे असून डॉ अश्विनी देव, केतकी पंडित यांच्याबरोबर भंडारी ब्रदर्सच्या सौ श्रुती भंडारी व क्रेडाईची महिला टीम त्यांना सहाय्य करणार आहे. ७ वे मदत केंद्र हे हॉटेल ऋतुगंध येथे असून डॉ रंजिता गोळे, लीना साठे, सारंग गुजर व गुजराथी वैष्णव समाजाची टीम ही जबाबदारी सांभाळतील. ८ वे मदत केंद्र टर्न अराउंडजवळ असणाऱ्या नित्यमुक्त साई रिझॉर्ट येथे असून डॉ सुचित्रा काटे, डॉ कविता बनकर, निशात पंडित, भाविका मुथा या मदत केंद्र सांभाळत आहेत. विद्यार्थी वाहतूक सेवा संघ, मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह असोसिएशन आणि हॉटेल हेरीटेजवाडी यांची चिअरींग टीम इथे असणार आहे. बर्फ वितरण आणि टर्न अराउंडची जबाबदारी अनिल नलवडे, डॉ महेश विभुते यांच्याकडे आहे. समर्थ मंदिर येथील कुल झोन पंकज नागोरी, तर हॉटेल निवांत येथील कुल झोन हे मिलिंद हळबे हे सांभाळणार आहेत. संपूर्ण स्पर्धा मार्गावर पाण्याच्या कॅनची जबाबदारी डॉ सुचित्रा काटे यांच्याकडे आहे अशी माहिती सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने संचालक ॲड कमलेश पिसाळ आणि सीए विठ्ठल जाधव यांनी दिली.
डॉ पल्लवी पिसाळ यांच्याकडे पारंगे चौक ते सैनिक सहकारी बँक या दरम्यान, तर पारंगे चौक ते पोलीस परेड ग्राउंड या दरम्यान वैद्यकीय मदत सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे संस्थापक अध्यक्ष डॉ संदीप काटे यांच्याकडे असेल. तर पोलिस परेड ग्राऊंड येथे पुढील उपचार तात्काळ करण्यासाठी सातारा रनर्स फौंडेशनचे संचालक व मेडिकल डायरेक्टर डॉ प्रतापराव गोळे हे स्वतः आणि त्यांची टीम सज्ज आहे.
मॅरेथॉन स्पर्धेच्या नियोजनामध्ये संपूर्ण घाटात योग्य वेळी व योग्य ठिकाणी ट्रॅफिक कोनचे नियोजन करणे ही जबाबदारी संचालक शैलेश ढवळीकर, भास्कर पाटील, दिनेश उधाणी, प्रफुल्ल पंडित, डॉ अजय शेडगे तसेच कैलास बागल सरांचा सह्याद्री ट्रेकर्स ग्रुप, १३ भवानी ग्रुप, माहेश्वरी संघटन, श्रीनिधी पतसंस्था, हिंदवी पब्लिक स्कूल, आयडीबीआय बँक, अनंत इंग्लिश स्कूल टेक्निकल बॅच, कॉम्प्युटर मिडिया डिलर्स असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्पचे सदस्य स्पर्धा मार्गावरील कोन व्यवस्थापन करणार आहेत.
तसेच स्पर्धेच्या मार्गाचे मोजमाप करणे ही जबाबदारी डॉ अविनाश शिंदे, डॉ अजय शेडगे, डॉ विकास पाटील, शैलेश ढवळीकर, डॉ राजेश शिंदे, दिनेश उधाणी आणि भास्कर पाटील यांनी घेतली आहे.
स्पर्धेचे वैद्यकीय संचालक डॉ प्रतापराव गोळे व हृदयरोग तज्ञ डॉ सोमनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली इमर्जन्सी कार्डियाक रेसिसिटेशन (CPR) चे प्रशिक्षण घेतलेले संयोजन समितीमधील सदस्य तसेच शासकीय वैद्यकीय महाविदयालय, सावकार गवळी महाविद्यालयाचे विद्यार्थी तैनात करण्यात आले आहेत. प्रतिभा हॉस्पिटल ॲन्ड हार्ट केअर सेंटर हे स्पर्धेचे मेडिकल पार्टनर आहेत.
तसेच स्पर्धेच्या मार्गावर ऑटोमटिक इलेक्ट्रिक डिफ्यब्यूलेटरची (AED) व्यवस्था असून, स्पर्धा मार्गावर ६ कार्डिअॕक अॕम्ब्युलन्स, ६ साध्या अॕम्ब्युलन्स, त्याचबरोबर AED मशीनने सज्ज अशा चार टू व्हिलर अॕम्ब्युलन्स देखील तैनात करण्यात आल्या असून प्रत्येक अॕम्ब्युलन्समध्ये एक फिजिशिअन व दोन डॉक्टर्स असणार आहेत. त्याचबरोबर फिजिओथेरिपिस्ट डाॕ स्वप्ना शेडगे यांच्या नेतृत्वाखाली कृष्णा इन्स्टिट्यूट आॕफ मेडिकल सायन्सेस कराड येथील टीमदेखील तैनात असणार आहे. त्याचबरोबर सातारा जिल्हा भूलतज्ञ संघटनेचे सर्व डाॕक्टर्स डाॕ अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज असणार आहेत.
मॅरेथॉन स्पर्धेचा एक्स्पो व पोलीस परेड ग्राउंड येथील तयारीसाठी आर्किटेक्ट सुधीर शिंदे व उपाध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित हे गेल्या महिन्यापासून तयारी करीत असून स्टॉल, स्टेज व स्पर्धकांसाठी लाईनअप सुविधा यांचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. स्पर्धकांना मेडल देण्याची जबाबदारी डॉ राजेश शिंदे व नितीन किरवे यांच्या बरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ही जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच स्पर्धकांसाठी पाणी, एनर्जी ड्रिंक्स व अल्पोपहार व्यवस्था करण्यासाठी श्री इर्शाद बागवान, संग्राम कदम व अॕड कमलेश पिसाळ हे विशेष काळजी घेत आहेत.
स्पर्धेच्या मार्गावरील खड्डे मुजवणे, रस्त्यांची डागडुजी व स्वच्छतेची जबाबदारी सातारा शहर नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली असून, स्पर्धेदरम्यान विद्युत व्यवस्थापनाची जबाबदारी ही मंगेश वाडेकर हे पाहत असून एक्स्पो व रेसच्या ठिकाणी सर्व तयारी ही पूर्णत्वास आली आहे. तसेच स्पर्धा संपल्यानंतर कुठेही कचरा रहाणार नाही याचीदेखील दक्षता घेण्यात आली आहे.
शिवगर्जना पोलीस अकादमी, १०० केपी, बॅगेज काउंटर सूर्यप्रभा हॉस्पिटल, रिकव्हरी सपोर्ट मीनाक्षी हॉस्पिटल, ग्राउंडवरील पाण्याची जबाबदारी इर्शाद बागवान आणि निरंजन पिसे, तर सर्व स्पर्धकांना पदक वितरण करणे अभिषेक भंडारी, डॉ देवदत्त देव, डॉ अविनाश शिंदे, शिल्पा जाधव, शीला नलावडे यांच्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, तर स्पर्धा मार्गावरील हेल्मेटधारी पायलट म्हणून डॉ चंद्रशेखर घोरपडे, ॲड कमलेश पिसाळ, डॉ प्रतापराव गोळे आणि राहुल घायताडे हे त्यांच्या पायलट बुलेटचे सारथ्य करणार आहेत.
स्पर्धेचे रेस डायरेक्टर श्री अभिषेक भंडारी हे साताऱ्यातील उत्कृष्ट मॅरेथॉन धावपटू असून त्यांनी आजवर अनेक मॅरेथॉन स्पर्धा अतिशय कमी वेळात पूर्ण केल्या आहेत. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनात ते सुरुवातीपासून सक्रिय आहेत.
संपूर्ण देशभरात नावाजल्या गेलेल्या या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस प्रशासन, पोलिस वाहतूक नियंत्रण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा नगरपालिका, जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा वन विभाग आणि एस.टी महामंडळ यांनी प्रशासकीय सेवांची बांधणी केली आहे.
तसेच ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रतिभा हॉस्पिटल, मीनाक्षी हॉस्पिटल, सावकार इंजिनीरिंग कॉलेज, सूर्यप्रभा हॉस्पिटल, अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यशोदा टेक्निकल इन्स्टिटयूट, कराड येथील कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे फिजिओथेरपी कॉलेज, महाराजा ग्रुप, जेष्ठ नागरिक संघ, ढाणे मेघि इंजिनीरिंग क्लासेस, सुविधा पेन्ट्स, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कन्याशाळा, कनिष्क नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सातारा इंग्लिश मिडीयम स्कूल व विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनाचे आत्यंतिक मोलाचे योगदान या स्पर्धेला लाभले आहे. त्याचबरोबर सर्व सातारकरांनी तसेच यवतेश्वर व सांबरवाडी येथील ग्रामस्थांनीदेखील जोरात तयारी केली असून येणाऱ्या पाहुण्यांची उत्तम व्यवस्था होण्यासाठी व स्पर्धेच्या नियोजनात मदत करण्यासाठी अतिशय महत्वाचे योगदान देऊ केले आहे.
स्पर्धकांसाठी साताऱ्यातील सर्व हॉटेल्स आणि लॉजचे बुकिंग फूल झाले असून विविध कार्यालयामध्येही स्पर्धकांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धकांना निवासाची व्यवस्था उपलब्ध न झाल्यास सातारकरांनी पाहुण्या स्पर्धकांच्या निवासाची व्यवस्था आपल्याकडे करावी असे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
त्याचबरोबर सातारकरांनी स्पर्धा मार्गावर असणारी आपली वाहने स्पर्धेदिवशी सकाळी १० वाजेपर्यत इतर ठिकाणी लावून आम्हाला तसेच पोलिस विभागाला सहकार्य करावे ही विनंती संयोजन समितीचे वतीने करण्यात आली आहे.
प्रमुख अतिथी आणि प्रायोजक यांच्या स्वागताची जबाबदारी अध्यक्षा डॉ आदिती घोरपडे, ॲड कमलेश पिसाळ, निशांत गवळी, डॉ चंद्रशेखर घोरपडे, जितेंद्र भोसले, अभिषेक भंडारी यांच्यावर आहे.
पोलीस परेड ग्राउंड येथील व्यासपीठ आणि स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाची जबाबदारी अध्यक्षा डॉ अदिती घोरपडे, उपाध्यक्ष आर्किटेकट उपेंद्र पंडित, सचिव विशाल ढाणे, सीएस नेहा दोशी, पायल विभूते यांच्यावर आहे.
तर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची जबाबदारी रेस डायरेक्टर अभिषेक भंडारी, डॉ देवदत्त देव, डॉ संदीप काटे, डॉ अविनाश शिंदे यांच्याकडे तर ज्यांनी ५ वेळा ही स्पर्धा पूर्ण केली आहे, अशा स्पर्धकांचे निकाल जाहीर करण्याची जबाबदारी ज्योती मांढरे, अर्चना शिंदे, सीमा भोसले यांच्याकडे, तर दिपप्रज्वलन जबाबदारी उपेंद्र पंडित, विशाल ढाणे यांच्यावर तर फूड पॅकेट वितरणाची जबाबदारी संग्राम कदम, निरंजन पिसे, राहुल घायताडे यांच्यावर आहे.
या उपक्रमाच्या निमित्ताने साताऱ्यात दाखल होणाऱ्या आपल्या पाहुण्यांना सातारकरांनी प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांना मदत करून ऐतिहासिक सातारा नगरीचा लौकिक वाढवण्यामध्ये सातारा रनर्स फौंडेशनच्या सर्व संचालकांच्या प्रयत्नांना हातभार लावावा असे आवाहन सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संदीप काटे, रेस डायरेक्टर अभिषेक भंडारी तसेच संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ आदिती चंद्रशेखर घोरपडे, उपाध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित व सचिव विशाल ढाणे यांनी केले आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |