सातारा : जिहे गावच्या हद्दीत हॉटेल जिव्हाळा येथे गाडीतील पेट्रोल संपल्याने रस्त्याच्या बाजूला दुचाकी ज्युपिटर गाडी उभी करून गाडीच्या डिगीत मोबाईल ठेऊन पेट्रोल आणण्यासाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने लक्ष ठेऊन गाडीसह मोबाईल घेऊन पोबारा केला आहे. याबाबतची फिर्याद राजेश चंद्रकांत भगत (वय ३५, रा. नहरवाडी, ता. कोरेगाव ) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार पिसाळ करत आहेत
जिहे गावच्या हद्दीत पेट्रोल संपल्याने रस्त्याच्या बाजूला गाडीसह अज्ञात चोरट्याचा पोबारा
by Team Satara Today | published on : 18 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा