नवी दिल्ली : जगभराच्या नजरा भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या सुटकेकडे लागल्या आहे. कारण, ‘नासा’ने तातडीने निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. सुनीता विल्यम्ससाठी रेस्क्यू मिशन राबवलं जातंय. सुनीता विल्यम्सच्या रेस्क्यू मिशनला सुरुवात झाली आहे. त्यासाठी रशियाच्या मदतीने अंतराळयान पाठवण्यात आले आहे.
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जवळपास 6 महिन्यांपासून अंतराळात आहेत. 5 जूनपासून ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आहेत. इतके दिवस अंतराळात राहिल्याने भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची तब्येत देखील बिघडत चालली आहे.
जगभराच्या नजरा भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या सुटकेकडे लागल्या आहे यातच नुकताच अंतराळातून सुनीता आणि बुचचा एक फोटो समोर आला होता. यात दोघांचेही वजन कमी झाल्याचे दिसत होते.
नासाच्या स्पेस ऑपरेशन मिशन डायरेक्टरेटचे प्रवक्ते जिमी रसेल यांनी या चिंतेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अंतराळ स्थानकावरील ‘नासा’च्या सर्व अंतराळवीरांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी फ्लाईट सर्जन तैनात करण्यात आले आहेत आणि सध्या सर्व अंतराळवीरांची स्थिती पूर्णपणे सामान्य आणि चांगली आहे.”
अंतराळात ताज्या अन्नाचा पुरवठा होत नसल्याने त्यांची तब्येत चांगली नसल्याचे बोलले जात आहे. ‘नासा’ने आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. ‘नासा’ने भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोम येथून सोयुज रॉकेटद्वारे एक अन-क्रू विमान (क्रू मेंबर्सशिवाय) पाठवले आहे.
हे विमान भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचेल. ‘नासा’ने या विमानातून काय पाठवले आहे ते जाणून घेऊया.
नुकतेच ‘नासा’ने रोसकॉसमॉसच्या कार्गो अंतराळयानाद्वारे अंतराळ स्थानकावर (ISS) एक्सपिडिशन-72 क्रूसाठी 3 टन अन्न, इंधन आणि इतर आवश्यक वस्तू पाठविल्या. काही दिवसांपूर्वी सुनीता विल्यम्स आणि इतर अंतराळवीरांच्या अन्नपुरवठ्यात संकट आल्याचा दावा करण्यात आला होता.
प्रत्यक्षात अंतराळ स्थानकावर असलेल्या फूड सिस्टीम लॅबोरेटरीमध्ये ताज्या अन्नपुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला होता. या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी ‘नासा’ने तातडीने पावले उचलली आणि अंतराळवीरांना जीवनावश्यक वस्तू आणि ताजे अन्न पुरवता यावे यासाठी 3 टन अन्न पाठवण्याचा निर्णय घेतला.
मकरंद पाटील यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
फोन उचलत नसल्याच्या कारणातून एकास मारहाण |
कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू |
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा |
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम |
स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढूया... |
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण |
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू |
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा |
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम |
स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढूया... |
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण |
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास |
दगडाने मारहाण प्रकरणी एकाविरोधात गुन्हा |
अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा |
मंगळवार पेठेतून दुचाकीची चोरी |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
शाहूनगरमधील घरफोडीची उकल |