अवैध गुटख्या संदर्भात रक्षक प्रतिष्ठानचे पोलिसांना निवेदन; तात्काळ कारवाई करण्याची केली मागणी

by Team Satara Today | published on : 15 December 2025


सातारा  : सातारा शहरांमध्ये गुटख्याची खुल्या विक्री सुरू आहे महाराष्ट्रामध्ये सुगंधी तंबाखू आणि मावा यांच्या साठवणूक आणि वितरणावर बंदी आहे असे असतानाही खुल्या मास्तरी आजच्या पिढीला धोकादायक आहे याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ माळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली .

यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले .या निवेदनात नमूद आहे की सातारा शहरातील दुकानांमध्ये लहान टपऱ्यांपर्यंत सहज गुटखा उपलब्ध होतो त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे कायद्याची भीती न बाळगता तो ग्राहकांना दिला जातो शाळा कॉलेज परिसरातील टप्प्यांमध्ये गुटख्याची विक्री होते तरुण आणि किशोरवयीन मुले या व्यसनाच्या विळख्यात अडकलेली आहेत

गुटखा बंदी असतानाही त्याची विक्री थांबत नाही . गुटखा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे त्यामुळे अवैध गुटखा बंदीच्या विरोधात रक्षक प्रतिष्ठानने मोहीम उघडली आहे .येत्या सात दिवसांमध्ये पोलिसांनी अशा गुटखा दुकानावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने अशा दुकानावर दाढ सत्र सुरू करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे .


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दिवंगत प्रसिद्ध साहित्यिक कथाकार सुधाकर बोरगावकर स्मृती पुरस्कारासाठी कथासंग्रह पाठवण्याचे लेखकांना आवाहन
पुढील बातमी
राज्यातील दुबार मतदारांच्या मुद्द्यावर आयोगाचे दुर्लक्ष : आ. शशिकांत शिंदे

संबंधित बातम्या