अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा

वाई पोलिसांची कारवाई; सुमारे सव्वा लाखांची दोन अग्निशस्त्रे हस्तगत

सातारा : वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे एक इसम एक विदेशी आणि एक देशी अशी दोन अग्निशस्त्रे (पिस्टल) एक लाख 20हजार रुपये किमतीचे घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्याने त्याला ताब्यात घेऊन अग्निशस्त्र (पिस्टल) जप्त केले. या प्रकरणी राजेश शंकर सणस यास अटक केली असल्याची माहिती परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकार यांनी दिली. राजेश सणस हा इसम कंबरेला विनापरवाना पिस्टल लावून मौजे एकसर (ता वाई) गावच्या हद्दीत बसस्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण विभागाने खात्री करून पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, अजित जाधव, नितीन कदम, प्रसाद दुदुस्कर, श्रावण राठोड, धीरज नेवसे आदींनी अग्निशस्त्र (पिस्टल) जप्त केले व त्यास अटक केली, अशी माहिती परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकार यांनी दिली.


मागील बातमी
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी
पुढील बातमी
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक

संबंधित बातम्या