पुसेगावात सेवागिरी यात्रेनिमित्त हरिनाम सप्ताह सुरू

by Team Satara Today | published on : 28 November 2025


पुसेगाव  : श्री.सेवागिरी महाराजांच्या ७८ व्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार, दि. २८ ते ५ डिसेंबर या कालावधीत येथील मंदिरात गुरुचरित्र व श्री.सेवागिरी विजयामृत ग्रंथाचे पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताह होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज आणि ट्रस्ट चेअरमन संतोष वाघ यांनी दिली.

या सप्ताहात पहाटे ४ ते ६ वाजता काकड आरती, ८ ते ११ गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण, दुपारी ३ ते ५ श्री सेवागिरी विजयामृत ग्रंथाचे वाचन होणार आहे. सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, ७ ते ९ कीर्तन त्यानंतर महाप्रसाद आणि जागर होणार आहे.  दि. २८ रोजी राजाराम महाराज काटे श्री. क्षेत्र देहू, दि. २९ रोजी मयुर महाराज बोडके ओझर, दि. ३० गणेश  महाराज साजुर , दि. १ रोजी संजय महाराज साळुंखे निगडी, दि.२  रोजी दळवी महाराज श्रीगोंदा , दि. ३ भाऊसाहेब महराज पवार कडेगाव , दि. ४ रोजी संजय महाराज वेळूकर , तर दि. ५ रोजी सकाळी ९ ते ११ या काळात

तुकाराम महाराज मुळीक आळंदी यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. गुरूवार, दि ४ रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत गावातून दिंडी सोहळा पार पडणार आहे. या ग्रंथवाचन आणि हरिनाम सप्ताहाचा लाभ सर्व भाविक-भक्त आणि ग्रामस्थांनी घ्यावा, असे आवाहन विश्वस्त  डॉ . सुरेश रणधीर जाधव, संतोष जाधव , सचिन देशमुख, गौरव जाधव यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजपच्या माध्यमातून सातारा शहराचा कायापालट करणार - ना. शिवेंद्रसिंहराजे; नगराध्यक्ष व सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन
पुढील बातमी
कार्यकारी अभियंता व महिला अधिकारी 42 हजार रूपये लाच घेताना जाळ्यात; टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांवर ओगलेवाडीत कारवाई, कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या