अटल चित्रकला स्पर्धांचे साताऱ्यात आयोजन

शिवछत्रपती प्रतिष्ठान व जिजाऊ प्रतिष्ठान यांचा संयुक्त उपक्रम

by Team Satara Today | published on : 30 December 2024


सातारा : शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात 5 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते बारा यादरम्यान श्रद्धेय अटल चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पवार व भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या व जिजाऊ प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष सिद्धीताई पवार यांनी दिली आहे.

या स्पर्धेसाठी विविध गटांचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते दुसरी अ गटासाठी निसर्ग देखावा,सजवलेला केक, आवडता प्राणी असे विषय देण्यात आले आहेत. इयत्ता तिसरी व चौथी या ब गटासाठी जादुई नगरी, मी पाहिलेला किल्ला, फुगेवाला हे विषय देण्यात आले आहेत. इयत्ता पाचवी ते सातवी क गटासाठी एक घर कामात मदत करणारी मुलगी, बाल शिवाजी व सवंगडी, माझा आवडता सण हे विषय देण्यात आले आहेत. व इयत्ता आठवी ते दहावी या गटासाठी माझ्या स्वप्नातील भारत, माझ्या आवडीचे स्वातंत्र्यवीर, माननीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असे विषय देण्यात आले आहेत.

ही स्पर्धा रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 12 या दरम्यान सातारा शहर व तालुक्यातील सर्व शाळांमधून भरवली जाणार आहे. विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी मोफत पेपर व रंगवण्याचे साहित्य दिले जाणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना याचे प्रमाणपत्र दिले जाईल. शाळांनी नोंदी 31 डिसेंबर पर्यंत नोंदवायचे असून विद्यार्थी यादी सादर करावयाची आहे. अधिक माहितीसाठी सागर सुतार 84 21 82 0470 किशोर कुदळे 98 23 32 70 73 संदीप माळी 98 60 63 96 95 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळी तालुके येत्या पाच वर्षात दुष्काळ मुक्त करणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रतिपादन
पुढील बातमी
शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांच्या गाडीचा अपघात

संबंधित बातम्या