सातारा : सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी बॉम्बे रेस्टॉरंट येथील फर्न हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या मोकळ्या जागेत चैतन्य संजय कांबळे रा. रविवार पेठ सातारा हा बेकायदेशीररित्या अंमली पदार्थाचे सेवन करीत असताना आढळून आला. अधिक तपास पोलीस हवालदार यादव करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, त्याच परिसरात सिद्धार्थ संजय पाटोळे रा. रविवार पेठ सातारा हा अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आला. अधिक तपास महिला पोलीस नाईक गोळे करीत आहेत.