बेंगळुरू : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिला दिवसाचा खेळ हा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं आधीपासूनच स्पष्ट होतं. तसेच या सामन्यात उर्वरित 4 दिवसही पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशात हा सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या उत्साहाने तिकीट काढून स्टेडियममध्ये आलेल्या चाहत्यांच्या पदरी घोर निराशा पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्याने बीसीसीआयने पावसाचा अंदाज घेऊनच सामन्यांचं आयोजन करावं, अशी संतप्त प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
नियोजित वेळेनुसार सामन्याआधी सकाळी 9 वाजता टॉस आणि 9 वाजून 30 मिनिटांनी खेळाला सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पाऊस सुरु असल्याने टॉसही होऊ शकला नाही. त्यानंतर बीसीसीआयकडून वेळोवेळी माहिती देण्यात आली. मात्र पाऊस थांबण्याच्या प्रतिक्षेत पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला. त्यानंतर पुन्हा पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे दुसरं सत्रही वाया गेला. त्यामुळे टी ब्रेक घेण्यात आला. मात्र टी ब्रेकनंतर बीसीसीआयने पहिला दिवसाचा खेळ रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं.
दरम्यान आता दुसऱ्या दिवशी सामन्याला सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तसेच 8 वाजून 45 मिनिटांनी टॉस होणार असल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. आता दुसऱ्या दिवशी वरुणराजाच्या कृपेमुळे सामना होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.
कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड टीम : टॉम लॅथम (कॅप्टन), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटीसाठी), मार्क चॅपमॅन, डेव्हॉन कॉनव्हे, मॅट हेनरी, डॅरल मिचेल, विल ओ रुर्के, एझाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, जेकब डफी, इश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टीम साउथी, केन विलियमसन आणि विल यंग.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |