सातारा : दाम्पत्याला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संबंधित महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 7 रोजी सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. शेजारी राहणारे वसंत जगन्नाथ पवार यांनी नवनाथ चव्हाण यांना, तू माझ्या बायकोला रोज दारू का आणून देतोस?’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर हाताने मारहाण करून त्यांना मीटरच्या खांबाला धडकविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
भांडण सोडविण्यासाठी चव्हाण यांच्या पत्नीसही आरोपीने कानाखाली मारून त्यांच्या पाठीच्या डाव्या बाजूस चावा घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच नवनाथ चव्हाण यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेत नवनाथ चव्हाण यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली. या प्रकरणी वसंत जगन्नाथ पवार (रा. मंगळवार पेठ, सातारा) यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
दाम्पत्याला मारहाण; जीवे मारण्याची धमकी, एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 08 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा