अवैधरित्या जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 January 2025


सातारा : अवैधरित्या जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी टेकडी कॅनॉल नजीक सदर बाजार, सातारा येथे अमोल पांडुरंग खरात रा. जयपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा आणि उमर अल्ताफ कुरेशी रा. सदर बाजार, सातारा यांनी वाहन चालवण्याचा परवाना कागदपत्रे नसताना त्यांच्या ताब्यातील आयशर ट्रक क्र. एमएच 50 एएन 7788 मध्ये 8 लाख 80 हजार रुपये किंमतीची 12 म्हैस जातीची जनावरे दाटीवाटीने कोंबून, त्यांना क्रुरतेने बांधून त्यांची वाहतूक करताना आढळून आले. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहिता बेपत्ता
पुढील बातमी
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

संबंधित बातम्या