पुर्नरचित हवामान आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे

by Team Satara Today | published on : 02 July 2026


सातारा : कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपीकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपीकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपीकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतक-यांच्या फळपीकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी राज्यामध्ये हवामान अधारीत फळपीक विमा योजना राबविणेचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सातारा जिल्ह्यासाठी सन २०२६-२७ मधील मृग बहारातील डाळींब, पेरु, सिताफळ व हळद या पीकांचा समावेश यामध्ये करणेत आला आहे. सदर योजनेमध्ये सन २०२०-२१ पासून काही बदल केले असून सदर योजना आता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छिक स्वरुपाची करणेत आली आहे. योजनेत सहभागी होणेसाठी हंगामनिहाय पीके, संरक्षित रक्कम, विमा हप्ता व सहभागी होणेची मुदत पुढीलप्रमाणे. शेतक-यांनी फक्त फक्त ५ टक्के विमा हप्ता रक्कम भरावयाची असून उर्वरीत विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे विमा हप्त्याची रक्कम अल्प असून ती प्रति हेक्टरी पुढीलप्रमाणे आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना या योजनेत सहभागी होता येईल. शेतक-यांनी ज्या शेतातील अधिसूचित फळपिकाचा विमा उतरावयाचा आहे, त्या शेताचा ७/१२ उतारा व खाते उतारा (८ अ) घेऊन आपले ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे त्या ठिकाणी आपला विमा हप्ता भरावयाचा आहे. तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रामार्फत व विमा कंपनीच्या संकेत स्थळावरुनही विमा हप्ता भरणेची व्यवस्था करणेत आली आहे. ७/१२ उतारा प्राप्त होत नसल्यास सदर शेतात अधिसूचित पिक असल्याचे स्वयं घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी होऊ इच्छिणा-या शेतक-यांनी डिजीटल पीक सर्वेक्षण अंतर्गत पीकांची नोंद करणे तसेच फार्मर आय डी काढणे बंधनकारक केले आहे.

अनिश्चित हवामानामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने तसेच पिकांच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याचे काम या योजनेद्वारे होत असल्याने जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेत सहभागी होणेचे आवाहन करणेत येत आहे. योजनेत सहभागी होणेसाठी आवश्यक विहीत नमुन्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून शेतक-यांनी ज्या राष्ट्रीयकृत अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आपले खाते आहे त्या बँकेत जाऊन अथवा विमा कंपनी कार्यालयातून किंवा सार्वजनिक सुविधा केंद्र व विमा कंपनीच्या संकेतस्थळाद्वारे हप्ता भरणेविषयीचे तसेच अधिक माहीतीसाठी गाव पातळीवरील सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार; १०० वर्षीय वृद्धेला अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर
पुढील बातमी
मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तात्काळ पुनरिक्षण कामाला सुरुवात करावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील

संबंधित बातम्या