विनयभंग प्रकरणी अज्ञातावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 15 June 2025


सातारा : एकाच्या राहत्या घरी अर्वाच्य व लज्जा उत्पन्न होईल अशा मजकुराचे पत्र पाठवल्या प्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी सातारा शहरातील कृष्णा नगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या राहत्या घरी अज्ञात इसमाने पोस्टाने बदनामीकारक, धमकी देणारे आणि घरातील महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशा मजकुराचे पत्र पाठवल्या प्रकरणी अज्ञात इसमावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जाचहाट प्रकरणी चार जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या