सातारा : निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात अपघात केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक रोजी संध्याकाळी 7 वाजता सातारा-वाठार रस्त्यावर प्रीतम दिलीप कदम रा. मंगळवार पेठ सातारा यांनी त्याच्या ताब्यातील दुचाकी क्र. एमएच 11 बीएन 1377 निष्काळजीपणे, भरधाव वेगात चालवून सचिन आप्पासो नामदास रा. साठोफार, ता. फलटण, जि. सातारा यांच्या पिकअप गाडीला धडक देऊन अपघात केला. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.