सातारा : एकास शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी टेकडी, सदर बझार येथे फटाके वाजवण्याच्या कारणावरून किरण दिलीप कडाळे (रा. लक्ष्मी टेकडी, सातारा) यांचा भाचा आर्यन याला शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच एका महिलेसह संजय सोनकांबळे, रवी सोनकांबळे, अजय सोनकांबळे, देवा सोनकांबळे, राजू सोनकांबळे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.
सदर बझार येथे एकास शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 07 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा