जिल्हा रुग्णालयात तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी आयोजन

by Team Satara Today | published on : 16 December 2025


सातारा :  जिल्हा रुग्णालय सातारा येथे तिरळेपणा निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन शुक्रवार,  दि.  १९ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय सातारा, पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान, पुणे व रोटरी क्लब ऑफ वाई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय, सातारा येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यामधून निवड झालेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया दि. २० व गरजेनुसार दि. २१ डिसेंबर रोजी मोफत करण्यात येणार आहेत. यासाठी पुणे येथील तज्ञ डॉक्टरांची टीम शस्त्रक्रिया करण्यासाठी येणार आहे.

सदर शिबिरासाठी शुक्रवार दि. 19 डिसेंबर रोजी रुग्णांनी सकाळी दहा वाजता नेत्र विभाग सातारा येथे आधार कार्ड व रेशनिंग कार्ड सोबत घेऊन यावे व अधिकाधिक गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी यांच्याशी संपर्क साधावा ; नोडल ऑफिसर श्री. मिलिंद शिंदे मोबाईल नंबर. ९४२३८०४०४९, इनचार्ज सिस्टर - श्रीमती सुषमा चव्हाण मोबाईल नंबर. ९२८४७०४४३८


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
परिवहन विभागाच्या बनावट लिंकपासून सतर्क राहा; अधिकृत शासकीय संकेतस्थळांचा वापर करा, परिवहन विभागाची सूचना
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीत 2928 प्रकरणे निकाली; 33 कोटी 39 लाख 91 हजार 602 रुपयांची वसुली

संबंधित बातम्या