नवी दिल्ली : टीम इंडिया या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथे दोन्ही टीम्समध्ये 5 टेस्ट मॅचची बॉर्डर-गावस्कर सीरीज होणार आहे. ही टेस्ट सीरीज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मधील भारतीय टीमची शेवटची टेस्ट सीरीज असेल. या सीरीजची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होईल. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ही सीरीज खेळली जाईल. ऑस्ट्रेलियाकडून आतापासूनच या सीरीजबद्दल वक्तव्य सुरु झाली आहेत. आता वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने विराट कोहलीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क विराट कोहली बरोबर जी स्पर्धा आहे, त्या बद्दल मोकळेपणाने बोललाय. विराट कोहली बरोबर जो सामना होतो, त्याचा मी आनंद घेतो असं स्टार्क म्हणाला.
“मैदानावर विराट कोहलीसोबत माझी जी स्पर्धा होते, त्याची मी मजा घेतो. आम्ही दोघही परस्पराविरुद्ध बरच क्रिकेट खेळलोय. आमच्या दोघांमध्ये काही चांगल्या लढती झाल्या आहेत. मी त्याला एक-दोन वेळा आऊट करण्यात यशस्वी ठरलोय. त्याने माझ्या विरुद्ध भरपूर धावा केल्यात, यात कुठलही दुमत नाही. त्यामुळे नेहमीच विराट सोबत चांगला सामना होतो, त्याचा आम्ही दोघे आनंद घेतो” असं मिचेल स्टार्क स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला.
22 नोव्हेंबरपासून पर्थवर भारत-ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु होईल. त्यावेळी हे दोन्ही क्रिकेटपटू आमने-सामने असतील. या टेस्ट सीरीजमधील सामने पर्थ, एडिलेड, ब्रिसबेन, मेलबर्न आणि सिडनीच्या मैदानावर होतील. यात डे-नाइट टेस्ट मॅच सुद्धा आहे. मागच्यावेळी दोन्ही टीम्समध्ये डे-नाईट कसोटी सामना झाला, त्यावेळी विराट कोहली कॅप्टन होता. टीम इंडियाला त्या मॅचमध्ये लज्जास्पद पराभवाचा सामना करावा लागलेला. विराट कोहलीला त्या पराभवाचा बदला घेण्याची इच्छा असेल.
विराट कोहली आणि मिचेल स्टार्क आतापर्यंत 37 इनिंग्समध्ये आमने-सामने आलेत. मिचेल स्टार्क विराट कोहलीला आतापर्यंत फक्त पाचवेळा आऊट करु शकलाय. विराटने त्याच्याविरोधात खोऱ्याने धावा केल्या आहेत. विराटची स्टार्क विरुद्ध सरासरी 81.40 आहे. 37 इनिंगमध्ये विराटने स्टार्क विरुद्ध 407 धावा केल्या आहेत. यात 46 चौकार आणि 6 सिक्स आहेत. अलीकडे दोन्ही प्लेयर्स आयपीएलमध्ये आमने-सामने आले होते. त्यावेळी विराट कोहलीची बाजू वरचढ होती.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |