सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा सातारकरांचा अभिमान

सौ. वेदांतिकाराजे भोसले; जेबीजी सातारा हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या एक्सपोचा शुभारंभ

by Team Satara Today | published on : 12 September 2025


सातारा, दि. 12  :  गेल्या 14 वर्षापासून सातार्‍यात सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा भरवण्यात येते या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतातीलच नाहीत तर सर्वत्र देशातील ही स्पर्धक धावण्यासाठी सहभागी होत असतात. ही स्पर्धा साताकरांचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले.

रविवार, दि. 14 रोजी होणार्‍या सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेसाठी शेंद्रे, ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी कारखाना परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एक्सपोचा शुभारंभ सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी स्पर्धेचे संयोजक तसेच मॅरेथॉनपटू व मान्यवर उपस्थित होते.

मॅरेथॉन एक्सपोमध्ये स्पर्धकांना लागणार्‍या प्रोटीन, शूज, बॅग टी-शर्ट अशा विविध सामग्रींचे स्टॉल लावण्यात आले असून यातील मान्यवरांच्या हस्ते शुभारंभानंतर खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.

सातारा हिल मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार्‍या स्पर्धकांनी मॅरेथॉन साठी लागणारे साहित्य खरेदी करावे, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केेले. उद्घाटनानंतर स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त करताना त्यांनी आयोजकांच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आबईचीवाडीत मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी
पुढील बातमी
साताऱ्यात रविवारी रंगणार जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा थरार

संबंधित बातम्या