एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 April 2025


सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी तीनजणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तमाशा सुरु असताना कालवा करु नको, असे म्हणाल्याच्या रागातून चिडून जावून तिघांनी एकास मारहाण केली. हा प्रकार सासपडे, ता. सातारा येथे दि. 23 रोजी घडला. फिर्यादी रोहित बाळकृष्ण यादव (वय 25) याने बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्याचे वडिल बाळकृष्ण यादव यांना संशयित आरोपी रोहन चंद्रकांत यादव, सुरज सूर्यकांत शिंदे, अनिरुध्द कृष्णत डांगे (सर्व रा. सासपडे) यांनी मारहाण केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीचे अपहरण
पुढील बातमी
प्रतापसिंहनगरात महिलांना मारहाण

संबंधित बातम्या