सातारा : प्रसिद्ध कवयित्री, पाटण येथील बाळासाहेब देसाई कॉलेजच्या मराठी विभागाच्या निवृत्त प्राध्यापक, ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद मनोहर कोपर्डे यांच्या ज्येष्ठ भगिनी आम्हा सर्वांच्या आक्का रामकली रमाकांत पावसकर यांचे वयाच्या 77 व्या वर्षी सातारा येथील जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये शनिवार दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ व चार विवाहित बहिणी असा परिवार आहे.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या पुरस्कार योजनेसाठी त्यांनी बहुमोल आर्थिक सहाय्य केले आहे. त्यांचे सहा कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये "निरव किनाऱ्यावर "( डिम्पल प्रकाशन ),हंबर ( चेतश्री प्रकाशन ) ओले अथांग श्वास (शब्दालय प्रकाशन ) सांजसावल्या -( डिम्पल प्रकाशन ), पावळण- (डिम्पल प्रकाशन), रें आभाळा -- ( डिम्पल प्रकाशन ) या कविता संग्रहाचा समावेश आहे.
'1980 नंतरची मराठी कविता प्रवृत्ती आणि प्रवाह ' यावर्ष या विषयावरील समीक्षा ग्रंथ ही स्वरूप प्रकाशन (औरंगाबाद ) द्वारे प्रसिद्ध आहे. त्यांचे पार्थिव जीवन ज्योत हॉस्पिटल येथे दुपारी दोन वाजेपर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर माहुली येथील वैकुंठ स्मशानभूमीतील गॅस दाहिनी मध्ये दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रसिद्ध कवयित्री प्रा. डॉ. रामकली पावसकर यांचे निधन
by Team Satara Today | published on : 14 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा