सातारा : महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्ये शैक्षणिक- सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री जानाई मळाई सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन, (जेमसेफ) सातारा संस्थेच्या श्री.छ.प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, माने कॉलनी सातारा या शैक्षणिक संकुलात नववर्षाचे औचित्य साधून, भारतीय संस्कृती व परंपरेचे जतन करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आलेला माता-पिता पाद्यपूजन व संकल्प सोहळा पारंपारिक पद्धतीने उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे संचालक श्री. गुलाब माने ,श्री. छगन पटेल, अँड .मनजीत माने संस्थेचे हितचिंतक, श्री. चंद्रहार माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव श्री संजीव माने यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
याप्रसंगी प्राथमिक विभागाचे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष श्री. अमोल काटे, उपाध्यक्षा सौ. सुनीता शिंदे ,माता- पालक संघाच्या अध्यक्षा सौ. निलम खामकर उपाध्यक्षा सौ. अंकिता चव्हाण परिवहन कमिटीच्या अध्यक्षा सौ. काजल जगताप, उपाध्यक्षा सौ. सुवर्णा राऊळ, माध्यमिक विभागाच्या शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष, श्री.शामराव पवार, उपाध्यक्षा श्रीम.नम्रता कुडाळकर, माता -पालक संघाच्या अध्यक्षा सौ. सीमा वाघमारे, उपाध्यक्षा सौ. रुपा माने त्याचप्रमाणे प्राथमिक विभागाचे शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य श्री. आनंद दानवले, श्री.अंकुश साळुंखे, श्री. संभाजी टकले माध्यमिक विभागाचे शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य श्री. सुखदेव शिंदे, श्री. संतोष रासकर, तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला कु. प्रतिभा जाधव यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर नवीन वर्षानिमित्त शाळेतील कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांनी शाळा, विद्यार्थी हिताच्या दृष्टीने सेवा-कर्तव्य बजावण्याबद्दल संकल्पपूर्वक प्रतिज्ञा घेतली. पारंपारिक पद्धतीने विद्यार्थ्यांनी माता-पित्यांचे पाद्यपूजन करून अभ्यासाबद्दल तसेच चांगल्या वर्तणुकीबद्दल प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यावर हात ठेवून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जडण-घडणीमध्ये पालक या नात्याने जबाबदार पालकांची भूमिका पार पाडणार असल्याची प्रतिज्ञा घेतली.
माता- पित्या बद्दल आपल्या संस्कृतीमध्ये असणारे स्थान, त्याचप्रमाणे अशा पारंपारिक संस्कृतीचे जतन करणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर बाल वयातच संस्कार करणाऱ्या या अनोख्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन पालकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैशाली भिसे व आभार श्री. दत्तात्रय काळे यांनी मानले.