ऊस मुकादमांकडून अजिंक्यतारा कारखान्याची १ कोटी ५९ लाख रुपयांची फसवणूक; सातारा तालुका पोलिसांत ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 14 February 2026


सातारा  : शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी कृषी औद्योगिक ऊस तोडणी व वाहतूक संस्था मर्या., शाहूनगर येथे तब्बल १ कोटी ५९ लाख ५४ हजार ९०० रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या सलग तीन गळीत हंगामांत करार करूनही ऊस तोडणीसाठी आवश्यक मशिनरी, मजूर व वाहने न पुरवता संस्थेची फसवणूक केल्याबाबत सातारा तालुका पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

याप्रकरणी फिर्यादी पैगंबर रज्जाक शेख (वय ६२, रा. समर्थनगर, सातारा) यांनी तक्रार दिली असून याप्रकरणी ११ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी बाळासाहेब शिवाजी राव देसाई, (रा. विश्वसृष्ठी बिल्डींग, शिवदर्शन कॉलनी, मलकापूर, ता. कराड, जि. सातारा, पोपट आप्पासो पाटील (रा. मु येडेनिपाणी, ता. वाळवा, जि. सांगली), अमोल दत्तात्रय कोळेकर (रा. मु पो. चाकोरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), काकासाहेब हनुमंत कोळेकर (रा. मु पो. चाकोरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), निळकंठ श्रीरंग भंडलकर (रा. मु पो. चाकोरे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), शिवाजी नरहरी गोरे (रा. मु. पो. कचरेवाडी, ता. माळशिरस), लक्ष्मण नवनाथ जाधव (रा. बीड सांगवी, ता आष्टी, जि. बीड), लक्ष्मण बन्सी राठोड (रा. मु. पो. ढेकू खुर्द, ता. नांदगांव, जि नाशिक) गोरख विनायक मोरे (रा. मु.पो. भालूर, ता. नांदगांव, जि नाशिक), कांतीलाल काळू राठोड (रा. मु.पो. ढेकू खुर्द, ता. नांदगांव, जि नाशिक), नारायण आनंदा गायकवाड (रा. भौरी, ता. नांदगांव, जि. नाशिक) अशी याप्करणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबतच्या तक्रारीनुसार पोलिसांची माहिती अशी : वरील संशयित आरोपींनी ऊस तोड टोळी (मजूर), ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाड्या, मुंगळे, ऊस तोडणी मशिन (हार्वेस्टर) तसेच दोन ट्रॅक्टर इन्फिल्डर पुरविण्याचा करार संस्थेशी केला होता. त्या बदल्यात संस्थेकडून उचल स्वरूपात एकूण १,५९,५४,९०० रुपये घेतले. मात्र, करारानुसार प्रत्यक्षात कोणतीही यंत्रणा किंवा मजूर न पुरवता संस्थेची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे संस्थेला मोठा आर्थिक फटका बसला असून ऊस गळीत प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. सातारा तालुका पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक काटकर या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैध अग्निशस्त्र विक्रीसाठी आलेल्या पाच जणांना अटक; ३ देशी पिस्टल, ५ जिवंत काडतुसे जप्त; १२.६७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुढील बातमी
लाच मागणीप्रकरणी एकावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल; कृष्णामाई घाटावर शूटिंगदरम्यान २५ हजारांची मागणी;

संबंधित बातम्या