कराड : भारत देश मुकेश अंबानी चालवत आहेत का? असा प्रश्न एलॉन मस्क यांच्या विधानाचा संदर्भ देत माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताच्या संदर्भात केलेल्या विधानाचा नेमका अर्थ काय, तसेच अमेरिकन सरकार आणि मस्क यांचे याबाबत नेमके मत काय आहे, याचे स्पष्टीकरण होणे गरजेचे असल्याचे चव्हाण यांनी म्हटले.
कराड येथे माध्यमांशी संवाद असताना चव्हाण यांनी भाजपला धारेवर धरले तसेच एपस्टीन फाईल वरून केंद्र सरकारला घेरले. ते म्हणाले, अमेरिकेतील जेफ्री एपस्टीन प्रकरणातील फाईल्सवरून भारतातील राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे. एपस्टीन फाईल्समध्ये केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या संदर्भातील उल्लेख, समोर आलेले फोटो, तसेच उद्योगपतींच्या नावांबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. एपस्टीन फाईल्समध्ये दोन फोटो समोर आले असून, या फोटोंच्या पार्श्वभूमीवर आणखी काही फोटो किंवा व्हिडिओ समोर येण्याची शक्यता असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. हरदीपसिंह पुरी यांच्या एपस्टीनशी झालेल्या भेटी या वैयक्तिक होत्या की एखाद्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून झाल्या होत्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एपस्टीन प्रकरणाचा परिणाम अमेरिकेच्या राजकारणावरही होण्याची शक्यता चव्हाण यांनी व्यक्त केली. आगामी अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला दोन्ही सभागृहांत मोठा धक्का बसू शकतो, असा दावा त्यांनी केला. तसेच परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास ट्रम्प यांना महाभियोगाला सामोरे जावे लागू शकते, असा अंदाजही चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. एपस्टीन फाईल्समधील कागदपत्रे, ई-मेल, फोटो आणि अन्य डिजिटल सामग्रीचा पुढील काळात सखोल तपास होईल. या प्रकरणाचे पडसाद केवळ अमेरिकेपुरते मर्यादित राहणार नसून त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारणावरही होऊ शकतो. भारताच्या राजकारणावरही या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता असून देशात राजकीय परिवर्तन अटळ असल्याचे सूचक विधान चव्हाण यांनी केले.
भारत देश मुकेश अंबानी चालवत आहेत का? : पृथ्वीराज चव्हाण, एपस्टीन फाईल वरून केंद्र सरकारला घेरले
by Team Satara Today | published on : 25 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा