सातारा : विहिरीतील पाण्यात बुडल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लिंब ता.सातारा येथील विहिरीमध्ये माणिक कृष्णा गायकवाड (वय 75, मूळ रा. रायगाव ता.जावली) पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना दिनांक 31 मे रोजी घडली आहे. शेतात काम करण्यासाठी ते आले होते. मात्र तेथून ते बेपत्ता झाले. मात्र विहिरीत ते पडल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.