सातारा : सातारा तालुक्यातील खावली येथील खासदार डी.पी मधून अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रुपये किमतीची १२० किलो वजनाची तांब्याची तार चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद महावितरण चे प्रधान तंत्रज्ञ ज्ञानदेव बळीराम नरळे, (वय ४२) यांनी सातार शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. चोरीचा तपास पोलीस हवालदार कदम करत आहेत.
सातारा तालुक्यातील खावली येथील डी.पी. मधून ७० हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरीस
by Team Satara Today | published on : 20 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा