सातारा : सातारा पालिकेच्या वसुली विभागाने थकबाकी गोळा करण्याच्या दृष्टीने धडक पावले उचलली आहेत. सातारा शहरात सहा पदके सक्रिय असून वसुली मोहिमेला गती देण्यात आली आहे. शनिवार पेठेतील दोन मिळकती सील करून पालिकेने बारा लाख 60 हजार 350 रुपयांची वसुली केली आहे.
याबाबतची माहिती वसुली विभागाचे प्रमुख उमेश महादर यांनी दिली असून या कारवाईच्या वेळी भाग लिपिक जगदीश मुळे, शिपाई अशोक वायदंडे, पियुष यादव व तुषार महामुलकर, तेजस कांबळे तेजस साखरे इत्यादी उपस्थित होते.
सुप्रिया भट व आशिष कुलकर्णी यांची मिळकत 185 शनिवार पेठ येथे आहे वसुली भरण्याच्या दृष्टीने त्यांना वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या . मात्रमुदतीत थकबाकी भरली गेल्यामुळे ने सातारा पालिकेने थेट कारवाईचा भडगाव उगारला. या मिळकतींवर जप्तीची नोटीस चिटकवण्यात येऊन ती सील करण्यात आली. सातारा पालिकेने बारा लाख 60 हजार रुपयांची वसुली केली आहे.