चोरीच्या प्रयत्नासह नुकसान प्रकरणी अज्ञातावर गुन्हा

सातारा : चोरीच्या प्रयत्नासह नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्‍यातील एमआयडीसी येथे अज्ञात चोरट्याने कार व बुलेटची तोडफोड करत चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. सचिन दशरथ महामुनी (वय 43, रा. एमआयडीसी परिसर, सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 7 जानेवारी रोजी घडली आहे.


मागील बातमी
पत्नीस मारहाण प्रकरणी पतीवर गुन्हा
पुढील बातमी
अज्ञातांकडून एकावर शस्त्राने वार

संबंधित बातम्या