सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हद्दपारीची कारवाई झाली असतानाही येथील आयटीआय रस्त्यावरील आझादनगर येथे विनापरवानगी फिरताना आढळून आल्याप्रकरणी यश सुभाष साळुंखे (वय 19, रा. आझादनगर, मोळाचा ओढा, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दि. 16 रोजी संशयित आरोपी फिरताना सापडला. ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित माने यांनी केली.