रजपूत बांधवांच्या वतीने शिवतीर्थावर पेढे वाटप

by Team Satara Today | published on : 25 September 2024


सातारा : महायुतीच्या मंत्रीमंडळाने कॅबिनेट च्या बैठकीत वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आहे. रजपूत समाजबांधवाचे प्रश्न या महामंडळाच्या माध्यमातून सोडवले जाणार आहेत. या महत्वपूर्ण निर्णयाच्या आनंदाप्रित्यर्थ सातार्‍यातील राजपूत बांधवांनी शिवतीर्थ पोवई नाका येथे पेढे वाटून आनंद व्यक्त केला. 
दि. 23 रोजी मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट मीटिंग मधे राजपूत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या वर्षी छत्रपती संभाजी नगर येथे राजपूत समाजाचा महासंमेलन मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी राजपुत समाजाने महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची माग़णी केली होती. त्याच मेळाव्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी लवकरात लवकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा शब्द दिला व तो पूर्ण देखील केला. त्याबदल त्यांचे रजपूत समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले. 
आज सातारा जिल्हा राजपूत समाजाकडून महाराणा प्रताप चौक राधिका रोड येथे बोर्डाला हार घालून शिवतीर्थावर जाउन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून पेढे वाटुन आनंद साजरा करण्यात आला. यावेळी राजपूत सेवा संघाचे विठ्ठलसिंह परदेशी, वीरसिंह परदेशी, अवधूतसिंह परदेशी, राजेंद्रसिंह राजपूत, संजयसिंह राजपूत, ओंकारसिंह परदेशी, महेशसिंह राजपूत, साइनाथसिंह परदेशी, अभय परदेशी, नितिन परदेशी, संजयसिंह परदेशी (सर), संदीपसिंह राजपूत, मुकुंदसिंह परदेशी, राजेंद्रसिंह परदेशी, नीलम राजपूत, पूजा परदेशी, प्रणव परदेशी, हनुमानसिंह परदेशी, भूपेन्द्रसिंह परदेशी तसेच भाजपा शहर अध्यक्ष विकास गोसावी व विश्व हिंदू परिषद पदाधिकारी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिक्षकांचा सातारा शहरात विराट आक्रोश मोर्चा
पुढील बातमी
अंमली पदार्थ बाळगणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

संबंधित बातम्या