दमदाटी प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 02 October 2024


सातारा : किरकोळ कारणावरून दमदाटी करणार्‍या रामकुंड सदर बाजार येथील इसमावर सातारा शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. याप्रकरणी अलीम रस्तुम शेख वय 28 राहणार 486 गुरुवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कोळी राहणार रामकुंड सदर बाजार यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख व कोळी हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून आरटीओ येथे रेडियम व पेंटिंग चे काम करतात. प्रशांत कोळी याने एका ट्रकच्या रेडियमचे काम परस्पर ठरवल्याने दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी संशयिताने फिर्यादीला शिवीगाळ दमदाटी करून मारहाण केली. तसेच त्यांचा रंगाचा डबा रस्त्यावर ओतून एक हजार रुपयांचे नुकसान केले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. बिले अधिक तपास करत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शनिवार पेठेतील चिकनच्या दुकानात भीषण स्फोट
पुढील बातमी
जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा

संबंधित बातम्या