सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर आरडाओरडा करुन गोंधळ घातल्याप्रकरणी तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रेमानंद तपासे, सिध्दार्थ तपासे, अजिंक्य तपासे (तिघे रा.मल्हार पेठ, सातारा) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस स्नेहल महाडीक यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 30 डिसेंबर रोजी घडली आहे. दरम्यान, प्रेमानंद देविदास तपासे (वय 59, रा. मल्हार पेठ) यांनी अजिंक्य तपासे, अनिकेत तपासे यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. शिवीगाळ करत दरवाजा तोडून नुकसान केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.