सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची 75 वी सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. याची माहिती बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी दिली आहे. तसेच जिल्हा बँकेला 2024 25 या आर्थिक वर्षात 125.19 कोटीचा निव्वळ नफा झाला आहे, तर कर पूर्व 233.48 कोटीचा ढोबळ नफा झाला असून बँकेने 11 हजार 469 कोटी 13 लाख इतक्या ठेवींची मजल गाठली आहे.
सातारा जिल्ह्याच्या सहकाराची प्रमुख बँक असणार्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने कृषी व ग्रामीण क्षेत्रात वित्तपुरवठा करण्याच्या दृष्टीने मोठी कामगिरी बजावली आहे. या बँकेला नाबार्ड महाराष्ट्र शासन राज्य बँक महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँक असोसिएशन तसेच देशातील सहकारी संस्थांनी 116 पुरस्कारांनी गौरवले आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांनी दिलेल्या पत्रकात नमूद आहे की, 2024-25 या आर्थिक वर्षात बँकेला ढोबळ नफा 233 कोटी 48 लाख रुपये झाला आहे, तर सर्व तरतुदी केल्यानंतर निव्वळ नफा 125 कोटी 19 लाख रुपये झाला आहे. बँकेबद्दल जनतेमध्ये असणारे विश्वासार्हता व पारदर्शक कार्यप्रणाली यामुळे बँकेच्या ठेवीत भरघोस वाढ झाली आहे. मार्च 2025 मध्ये आढावा घेतला असता 11 हजार 469 कोटी 13 लाख इतक्या ठेवींची मजल गाठली गेली आहे बँकेची कर्ज वसुली विक्रमी असून निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य टक्के आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची 75 वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या सभागृहात शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता होणार आहे मुख्य कार्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला 125.19 कोटीचा नफा
अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांची माहिती; 16 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा
by Team Satara Today | published on : 13 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा