सातारा : शेंद्रे, ता. सातारा येथे ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला असून दुचाकीवरील अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलीवर सातार्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत दुपारी तीनच्या सुमारास दिगंबर मनोज शिंदे (वय 22, रा. तामकणे, ता. पाटण) आणि योगिनी काशीनाथ जाधव (वय 17, रा. निवकणे, ता. पाटण) हे दोघे दुचाकीवरून सातार्याकडे येत होते. शेंद्रेजवळ आल्यानंतर रॉंग साईडने आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात दिगंबर शिंदे या तरूणाचा जागीच मृत्यू झाला, तर योगिनी जाधव गंभीर जखमी झाली. या अपघातानंतर रुग्णवाहिकेने दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर योगिनी हिला सातार्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.