माळेवाडी स्टॉप येथे कुटुंबातील वादातून मारहाणीची घटना; पुतण्याविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 15 May 2026


सातारा : कण्हेर, ता. सातारा येथील माळेवाडी स्टॉप येथे कुटुंबातील वादातून मारहाणीची घटना घडली आहे. याप्रकरणी पुतण्याने फिर्यादी अरुणा इंदलकर यांच्या मुलाला वायरने मारहाण करून जखमी केले तसेच फिर्यादीच्या पायावर दगड मारून दुखापत केल्याची तालुका पोलिसांत नोंद आहे. आरोपीने फिर्यादीच्या पतीसही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याची तक्रार देण्यात आली आहे.

ही घटना दि. ११ रोजी सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास माळेवाडी स्टॉप, कण्हेर (ता. जि. सातारा) येथे घडली. याप्रकरणी अरुणा तानाजी इंदलकर (वय ५५, रा. आकले, कण्हेर, ता. सातारा) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीच्या तक्रारीवरून संजय बबन इंदलकर (रा. आकले, कण्हेर, ता. जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पो.हवा कुंभार करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात भाजपचा शक्तिप्रदर्शनात्मक मेळावा; घरकुल, शेतकरी आणि सहकाराच्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका
पुढील बातमी
सदरबझारातील वस्तीगृहातून अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता; शोधमोहीम सुरू

संबंधित बातम्या