सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सातारा शहरातील एका उपनगरात राहणारी 18 वर्षीय युवती घरात कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.