गोडोलीत दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार जखमी, वाहनचालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 07 October 2026


सातारा :  गोडोली परिसरात दुचाकीला पाठीमागून चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातानंतर वाहनाच्या क्रमांकाच्या आधारे सातारा शहर पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गणेश हणमंत देवरे (रा. दहिवड, ता. खटाव) यांनी पोलिसांत तक्रार दिली. ते दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या चारचाकीने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात देवरे जखमी झाले.
घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून हवालदार कारळे तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मित्राची वाट पाहत थांबलेल्या अल्पवयीन मुलास मारहाण; शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार
पुढील बातमी
विवाहितेचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा

संबंधित बातम्या