जनमताचा कौल आम्‍ही स्‍वीकारला; महायुतीच्या काही घटकांनी चुकीच्या गोष्टी केल्या पण मौका सबको मिलता है - मंत्री जयकुमार गोरे यांचा सूचक इशारा

by Team Satara Today | published on : 30 October 2026


सातारा : पुणे पदवीधर मतदारसंघात महायुती आणि भाजपसाठी चांगले वातावरण होते. अशा परिस्‍थितीत पदवीधर मतदारसंघाचा आलेला निकाल धक्कादायक आहे. हा जनमताचा कौल आम्‍ही स्‍वीकारला आहे. मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल. ‘मौका सबको मिलता है,’ असा इशारा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पश्‍चिम महाराष्‍ट्रातील महायुतीतीलच मित्रपक्षांना दिला.
पत्रकारांशी बोलताना ना. जयकुमार गोरे म्हणाले, पदवीधरचा निकाल हा जनमताचा कौल म्हणून स्‍वीकारतो. आम्ही नक्की बघू, खात्री करू की नेमकं कशामुळे अशा पद्धतीचा निकाल आला. मागच्यावेळी आम्‍ही दोन्ही जागा गमावल्या होत्या. मात्र, यावेळी एका जागेवर यश मिळाले आणि दुसऱ्या जागेवर आम्हाला अपयश स्वीकारावे लागले आहे, पण चांगले वातावरण असताना असा अनपेक्षित निकाल कसा आला? याची खात्री करून मूळ कारणांचा शोध घेतला जाईल.
निवडणुकीत महायुतीच्या काही घटकांनी चुकीच्या गोष्टी केल्याचे खरे आहे. ठीक आहे, ‘मौका सबको मिलता है,’ असा सूचक इशाराही ना. गोरे यांनी दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय; सहकारी संस्थांतील राजकीय घडामोडींना ब्रेक
पुढील बातमी
कायदा हातात घेतल्यास राजू शेट्टी यांच्यावर कारवाई : ना. शंभूराज देसाई, वस्तुस्थितीची माहिती न घेता राजू शेट्टी यांच्याकडून भूमिका मांडली जात असल्याचा टोला

संबंधित बातम्या