नेले येथील मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल; शेतजमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरुन वाद

by Team Satara Today | published on : 15 April 2026


सातारा : नेले (ता. जि. सातारा) येथे शेतजमिनीच्या वहिवाटीच्या कारणावरुन झालेल्या वादावादीतून पती - पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. गौरव विलास जाधव, विलास गणपती जाधव, सुनंदा विलास जाधव (सर्व रा. नेले, ता. सातारा) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. अतुल जाधव यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत स्वत:सह, पत्नी सुप्रिया हिला शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पो. हवालदार वायदंडे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हुंडाबळीप्रकरणी सातारा शहर पोलिसांत चौघांविरुध्द गुन्हा दाखल
पुढील बातमी
वीजचोरीप्रकरणी साताऱ्यातील एकावर गुन्हा दाखल

संबंधित बातम्या