सातारा : जुना मोटर स्टॅन्ड येथे एकाचा रस्ता अडवून तिघांनी मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय अरुण कदम (वय 27, रा. शेंद्रे ता.सातारा) यांनी राकेश अनिल यमकर (वय 20, रा.शिवराज पेट्रोलपंप परिसर, सातारा), आकाश राजकुमार गोळे (वय 19, रा. सोनवडी-गजवडी ता.सातारा), प्रसाद दिपक गवळी (वय 25, रा. गुरुवार पेठ, सातारा) या तिघांविरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 23 जुलै रोजी घडली आहे. कोयता, लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार कदम करीत आहेत.